लता (कवी- यशवंत देव)

Lata Online Archive

Famous Marathi composer Yashvant Deo has written a superb Marathi poem extolling the virtues of the singer's extraordinary singing qualities. A Whataspp forward that is archived here for the Lata-admirers.

लता (कवी- यशवंत देव)

सगळे गाती सूर लावुनी, जीव लावुनी गातो कोण
कवितेच्या गर्भात शिरुनी भावार्थाला भिडतो कोण?

 
गीतामधली भाववादळे सबल स्वरांनी झेली कोण 
अहंकार फेकून सुरांना ममतेने कुरवाळी कोण?
 
नाभीतून ओंकार फुटावा तैसे सहजच गातो कोण
गात गाता, अक्षर अक्षर सावधतेने जपतो कोण?
 
शब्दांच्या पलीकडले स्पंदन सुरातुनी आळ‌वितो कोण 
गीतामधली विरामचिह्ने, तीही बोलकी करतो कोण?
 
निजस्वराचा पहिला श्रोता अपुला आपण होतो कोण 
विश्वामधल्या रसिककुळाशी सुरेल हितगुज करतो कोण?
 
कोण प्रश्न हा उठतो कसा. 'लता' म्हणा अन् गप्पा बसा 
कोण म्हणजे दुसरे कोण? लता मंगेशकर आणखी कोण?

 

Author info is not available!

Copyright © 2023 Lata Online. All Rights Reserved.Lalaonline logoRight Parenting logo